लॉन्च झाला गुगलचा पिक्सल २


मुंबई : मागच्या वर्षी पिक्सल डिव्हाईस बाजारात उतरवून गुगलने आगमन केले. पण गुगलचा पिक्सल २ स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. सध्या तरी बाजारात अॅपल आणि सॅमसंगच्या फोनचीच चलती असली तरी अॅपल ८ प्लसला हा स्मार्टफोन टक्कर द्यायची शक्यता आहे.

६ इंचांची गुगल पिक्सल २ ची स्क्रिन असून ज्याचा एसपॅक्ट रेशो १८:९ आहे आणि स्क्रिन बॉडी रेशो ७६.५ टक्के आहे. एलजीने गुगलचा हा फोन बनवला असून १२ मेगापिक्सलचा मुख्य सेंसर आणि ८ मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये आहे. फोनच्या मागच्या कॅमेराचे अपार्चर एफ/१.८ आहे जे ऑप्टिकल स्टेबिलायजेशन प्रणालीचे आहे. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायजेशनही याचबरोबर यामध्ये देण्यात आल्यामुळे स्पष्ट फोटो काढायला मदत होते आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीही चांगले फोटो येतात. ३,५२० mAhची बॅटरी गुगल पिक्सल २ मध्ये आहे. फोन एकदा चार्ज केल्यावर दीड दिवसांपर्यंत ही बॅटरी चालू शकते. गुगल लेंसही याचबरोबर फोनमध्ये देण्यात आली आहे, ज्यामुळे ठिकाणे आणि गल्ली ओळखणे सोपे होणार आहे. ७३,००० रुपये (६४जीबी) एवढी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment