भारतीय बाजारात दाखल झाली कावासाकीची निंजा ६५०


नवी दिल्ली : भारतीय बाजारात आपली निंजा ६५० बाईकचे नवे एडिशन जपानी वाहन निर्माता कंपनी कावासाकीने लॉन्च केले आहे. ब्लॅक, ग्रे आणि ग्रीन कलर्समध्ये केआरटी एडिशन (कावासाकी रेसिंग टीम) ची निंजा ६५० ही बाईक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

साधारण निंजा ६५० पेक्षा नव्या एडिशनची किंमत १६ हजार रुपयांनी अधिक आहे. नव्या बाईकमध्ये कंपनीने कुठलेही मेकॅनिकल बदल केलेले नाही. यात केवळ कलर आणि ग्राफिक्स देण्यात आले आहेत. शुन्याहून १०० किमी प्रति तासाचा स्पीड घेण्यासाठी कावासाकी निंजा ६५० ला केवळ ४.६५ सेकंदांचा वेळ लागतो. कावासाकी झेडएक्स-१० आर सारखी नव्या बाईकची स्टाईल आहे. निंजा ६५० केआरटीमध्ये जुनेच ६४९ सीसी पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. ६७.२ बीएचपीची पावर आणि ६५.७ एनएमचे टॉर्क हे इंजिन जनरेट करते. ६ स्पीड गिअरबॉक्सने या इंजिनला जोडण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरनंतर सर्व कावासाखी डिलर्सकडे ही बाईक उपलब्ध असणार आहे. ५.४९ लाख रुपये (एक्स-शो रुम) केआरटी एडिशन (कावासाकी रेसिंग टीम) असलेल्या निंजा ६५० बाईकची किंमत ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment