झेन कंपनीने आणला बजेट स्मार्टफोन


मुंबई : अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन झेन या मोबाईल उत्पादक कंपनीने लॉन्च केला आहे. अवघी ५,०९९ रुपये किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषाही उपलब्ध असून ४जी Volte झेनच्या या स्मार्टफोनमध्ये असून १.३ GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि ५ इंचांची स्क्रिन आहे. २३००mAh एवढी या स्मार्टफोनच्या बॅटरी क्षमता आहे, तर ५ मेगापिक्सलचा फ्लॅश असलेला रियर कॅमेरा आणि ७ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनला देण्यात आला आहे. अॅडमायर युनिटी स्मार्टफोनमध्ये १जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी असून ३२ जीबी पर्यंत मेमरी वाढवता येणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, व्हिस्टोसो, गो२पे, चिलएक्स आणि झेन स्टोअर ही ऍप्स या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ड आहेत.

Leave a Comment