बीएमडब्ल्यूने सादर केल्या आपल्या दोन जबरदस्त बाईक्स


नवी दिल्ली : आपल्या दोन जबरदस्त बाईक्स कार उद्योगात प्रसिद्ध असलेल्या बीएमडब्ल्यू कंपनीने सादर केल्या आहेत.बीएमडब्ल्यूने आपल्या बाईक्स इटली येथील मिलानमध्ये सुरु असलेल्या EICMA मोटरसायकल शोमध्ये लॉन्च केल्या आहेत. एफ ७५० जीएस आणि एफ ८५० जीएस नावाने या दोन बाईक्स लॉन्च केल्या आहेत.

एफ ७५० जीएस आणि एफ ८५० जीएस या दोन्ही बाईक्स नव्या इंजिनसह बीएमडब्ल्यू कंपनीने बाईक शोमध्ये सादर केल्या आहेत. बॉक्सर-ट्विन इंजिन ऐवजी इक्वल पॉवर असलेले नवे ८५३ सीसी पॅरेलल-ट्विन इंजिन या बाईक्समध्ये देण्यात आले आहे. यासोबतच बॅलेसिंग शॉफ्ट बाईकमध्ये दिल्यामुळे बाईकमध्ये होणारे वायब्रेशन कमी होणार आहे.

बीएमडब्ल्यूने ८५३ सीसीच्या इंजिनला अँटी-हॉपिंग क्लच असलेले ६ स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. हे इंजिन ९.८ बीएचपी पावर आणि ७६.४ एनएम टार्क जनरेट करते. इंजिनसाठी देण्यात आलेली नवी फ्रेम खूपच मजबूत आणि फिट आहे. डायनॅमिक ईएसए इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन या बाईक्समध्ये कंपनीने दिल्यामुळे बाईकची आरामदायक राईड खड्ड्यांतही करता येईल. पण कंपनीने अद्याप ही बाईक बाजारात विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल यासंदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही.

Leave a Comment