मंगळावरच्या पायलटने घेतला पृथ्वीवर पुनर्जन्म


रशियातील २० वर्षीय बोरिसका किपर्नियानोविच या अतिबुद्धीमान मुलाला गतजन्माच्या आठवणी येत असल्याने तो जगभर सध्या चर्चेत आला आहे. या मुलाच्या आठवणींप्रमाणे गतजन्मी तो मंगळ ग्रहावरचा पायलट होता व पृथ्वीवर येताना त्याचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याला पृथ्वीवर पुनर्जन्म मिळाला आहे. लेमेरियन संस्कृतीच्या अनेक आठवणी तो सांगतो आहे. तो सांगतो अनेकदा त्याने मंगळ पृथ्वी असा प्रवास केला आहे. मंगळावरील जीवसृष्टी पूर्वीपासूनच प्रगत आहे व इजिप्तच्या स्पिंक्सचा मंगळाशी निकटचा संबंध आहे. या मागचे रहस्य उलगडता आले तर पृथ्वीवरचे अवघे जीवन बदलणार आहे.


बोरिसकाच्या म्हणण्यानुसार मंगळावरील लोक पूर्वीपासूनच आकाशगंगांना टाळून प्रवास करण्यात प्रवीण आहेत. लेमेरियन संस्कृती ७० हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर नांदत होती. त्याच्या अनेक मित्रांनी ही संस्कृती नष्ट होताना पाहिली आहे. इजिप्तमधील स्फिक्स च्या कानांच्या मागे हे रहस्य लपले आहे मात्र त्याचा कोड वर्ड बोरिसकाला आत्ता आठवत नाहीये.

बोरिसकाचे आईवडील सांगतात, जन्मापासूनच तो अत्यंत हुषार आहे.१९९६ मध्ये जन्मलेल्या बोरिसकाने वयाच्या तिसर्‍या महिन्यापासून शब्द बोलायला तर आठव्या महिन्यापासून वाक्ये बोलायला प्रारंभ केला होता. १ वर्षाचा होता तेव्हा तो संपूर्ण वर्तमानपत्र वाचू शकत असे. वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच तो ब्रह्मांडाच्या रहस्यांविषयी चर्चा करत असे. तो सांगतो मंगळावरील माणसे ७ फुटांपेक्षा उंच आहेत व ती जमिनीखाली राहतात. ती कार्बन डाय ऑक्साईडवर जगतात व वयाच्या ३५ नंतर त्यांचे वय वाढत नाही.

Leave a Comment