भारत बांग्लादेश दरम्यान बंधन रेल्वे धावणार


भारताच्या कोलकाता व बांग्लादेशाचे दक्षिण पश्चिम भागातले मोठे औद्योगिक शहर खुलना यांच्या दरम्यान येत्या १६ नोव्हेंबरपासून क्रॉस कंट्री रेल्वे सुरू होत असून या रेल्वेचे नांव बंधन एक्स्प्रेस असे ठेवले गेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांग्लाच्या पंतप्रधान शेख हसीना या रेल्वेचे व्हिडीओ कॉन्फरर्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार असल्याचे बांग्ला देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही पंतप्रधानांनी गुरवारी बंधन एक्स्प्रेसला मान्यता दिल्याचे संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

कोलकाता व खुलना हे १७७ किमीचे अंतर ही गाडी साडेचार तासात पूर्ण करणार आहे. भारतीय कर्जपुरवठ्यातून बांधल्या गेलेल्या दोन रेल्वे पुलांचा व ढाका कोलकाता मैत्री रेल्वे सेवा सुलभ करण्याची ही सुरवात असल्याचे सांगितले जात आहे. भारतातून बांग्लादेशात जाणारे प्रवासी अथवा बांग्लादेशातून भारतात येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी ठरविक स्टेशनवरच इमिग्रेशनची सुविधा दिली जाणार आहे. पूर्वी इमिग्रेशन घेण्यासाठी प्रवाशांना दोन तासांपेक्षा अधिक काळ वाट पहावी लागत होती. नवीन रेल्वे सेवेमुळे हा वेळ वाचणार आहे.

Leave a Comment