ट्विटरने ट्विटची अक्षरमर्यादा वाढवली


ट्विटची अक्षरमर्यादा ट्विटरने वाढवून ती २८० अक्षरांची केली आहे. ही अक्षरमर्यादा गेल्या वर्षी ट्विटरकडून १४० पर्यंत वाढवण्यात आली होती, पण ट्विपल्सने ती आणखी वाढवावी अशी मागणी केली होती. १४० अक्षरे व्यक्त होण्यासाठी खूपच कमी पडतात असे अनेकांचे म्हणणं होते, ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून त्यानुसार संदेशासाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ट्विपल्स आता १४० ऐवजी २८० अक्षरांमध्ये ट्विट करू शकतात.

अनेकांसाठी ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अडचणीची ठरत होती. तशी तक्रारही अनेक युजर्सनी केली होती. ट्विटरकडून म्हणूनच अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्याकडून सप्टेंबर महिन्यात २४० अक्षरांचे पहिले ट्विट करण्यात आले होते. हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे. यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती. आमच्या टीमने लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन विचारपूर्वक जे बदल केले आहेत, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असे डोर्सी यांनी ट्विटमध्ये लिहिले होते. सप्टेंबर महिन्यात अक्षरमर्यादा वाढवण्याचा प्रयोग ट्विटरने केला होता, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शब्दमर्यादा वाढवण्यात आली आहे.

Leave a Comment