जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची नवी ऑफर


मुंबई : नुकताच एक प्लॅन एअरटेलने लाँच केला असून आपल्या यूजर्ससाठी एअरटेलने तब्बल ३००जीबी ४ जी डेटा प्लॅन आणला आहे. ३६० दिवसांसाठी हा प्लॅन वैध असणारआहे. यासोबतच दररोज १०० मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगही या प्लॅनमध्ये मिळणार आहे.

३,९९९ रुपये ऐवढी या प्लॅनची किंमत असून जवळजवळ वर्षभरासाठी हा प्लॅन असणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर दिवसाला किती डेटा वापरु शकतो. म्हणजेच यूजर्सला दिवसाला कोणतीही डेटा मर्यादा नाही. त्याचबरोबर १९९९ रुपयांचा प्लॅन देखील एअरटेलने लाँच केला आहे. यूजर्सला ज्यामध्ये १८० दिवसांसाठी १२५ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील दररोज वापरासाठी डेटा लिमिट नाही.

Leave a Comment