बेटांवर डिलिव्हरी देण्यासाठी अलिबाबाची ड्रोन कार्यरत


चीनमधील अग्रणी ई कॉमर्स कंपनी अलिबाबाने बेटांवर राहणार्‍या नागरिकांना जलद डिलिव्हरी देण्यासाठी ड्रोन चा यशस्वी वापर केला असून बेटांवर डिलिव्हरीसाठी असा वापर प्रथमच केला गेला आहे. ३ मानवरहित ड्रोन चा सहाय्याने १२ किलो पॅशन फ्रूटस पाठविली गेली असून वेगवान वारे असतानाही या ड्रोननी ५ किमीचे अंतर ९ मिनिटांत कापून ही डिलिव्हरी दिली आहे.या प्रत्येक ड्रोन ची क्षमता ७ कि लोपर्यंतचे वजन वाहून नेण्याची आहे.

या ड्रोनमुळे वेळातच नाही तर वाहतूक खर्चातही लक्षणीय बचत होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नोव्हेंबर ११ ला अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे असला तरी अलिबाबाने २००९ पासून हा दिवस सिंगल्स शॉपिंग फेस्टीव्हल म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू केली आहे. आगामी ११ नोव्हेंबरलाही या कामी जादा ड्रोन अलिबाबाकडून तैनात केली जाणार आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून प्रामुख्याने ताजे अन्न व औषधे पोहोचविली जाणार आहेत. पाण्यात असलेल्या बेटांवरील वस्तीपर्यंत माल पोहोचविण्यासाठी भविष्यात अलिबाबा ड्रोनचा वापर अधिक प्रमाणात करणार आहे.

Leave a Comment