आयफोन X वर जिओची कॅशबॅक ऑफर


ज्यांनी अॅपलच्या आयफोन X चे प्री-बुकींग केले होते हा फोन मिळण्यास त्यांना सुरुवात झाली असून ग्राहकांमध्ये या फोनबाबत मोठी उत्सुकता आहे. ग्राहकांना या फोनमध्ये असणारी आकर्षक फिचर्स भुरळ घालत आहेत. पण अनेकांच्या फोनची किंमत खूप जास्त असल्याने तो आवाक्या बाहेर असल्यामुळे एक अनोखी शक्कल कंपनीने लढवली आहे. कंपनीने ग्राहकांना एक लाखांहून अधिक किंमत असलेला हा फोन २६,७०० रुपये एवढ्या कमी किंमतीत उपलब्ध करुन दिल्यामुळे आयफोनची क्रेझ ज्यांना आहे हा फोन ते किंमत आवाक्यात आल्याने खरेदी करु शकतात.

हे शक्य होणार आहे ते फक्त रिलायन्स जिओच्या माध्यमातून. जिओने यासाठी एक कॅशबॅक ऑफर आणली आहे. पण जिओकडून यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. फोन घेतल्यानंतर तो कंपनीला तुम्हाला परत करावा लागणार आहे. या फोनमध्ये रिलायन्स जिओचे सिमकार्ड ग्राहकांना वापरावे लागणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना दर महिन्याला जिओचे ७९९ रुपयांचे रिचार्ज करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांना या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.

पण हा फोन खरेदी करताना ग्राहकांना सुरुवातीला फोनची पूर्ण किंमत भरावी लागेल. ग्राहकांनी जर हा फोन एक वर्षानी फोन परत केल्यावर ६५,३०० परत मिळणार आहेत. ग्राहकांना या अनोख्या कॅशबॅक ऑफरमुळे हा फोन घेण्याची हौस भागवता येऊ शकते. हा फोन तुम्ही जिओच्या वेबसाईटवर जाऊनही विकत घेऊ शकता.

Leave a Comment