डीसीबीच्या एटीएममधून निघाली २००० रुपयांची अर्धी नोट


नवी दिल्ली – जामिया नगर परिसरातील डेव्हलपमेंट क्रेडिट बँक (डीसीबी) च्या एटीएममधून सोमवारी दो हजार रुपयांची एक वेगळीच नोट निघाली. ही अर्धी नोट खरी होती, तर अर्ध्या नोटच्या जागी टेपद्वारे पांढरा कागद चिटकवलेला होता. अशाप्रकारची नोट एटीएममधून निघण्याचे देशातील हे पहिलेच प्रकरण आहे.

याबाबत पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दुपारी सुमारे १२ वाजता शाहिनबागमध्ये राहणारे २९ वर्षीय मोहम्मद शादाब शाहिनबाग ठोकर नंबर आठमध्ये एका डीसीबी एटीएममधून १० हजार रुपये काढण्यासाठी गेले होते. यस बँकेचे एटीएम शादाब यांच्याकडे होते. जसोलामध्ये त्याची ब्रँच आहे. दोन हजारांच्या चार नोटा, ५०० रुपयांच्या ३ नोटा आणि १०० रुपयांच्या ५ नोटा एटीएममधून निघाल्या. त्यातील एक दोन हजाराची नोट अर्धी होती आणि अर्ध्या नोटेच्या जागी कागद चिटकवलेला होता.

एटीएम बूथवर लिहिलेल्या कस्टमर केअर नंबरवर शादाब यांनी लगेचच कॉल केला. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांना या प्रकरणी हरिनगरमधील ब्रँचमध्ये जाण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी यस बँकेच्या ब्रँचच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली.

एखादी बनावट किंवा विचित्र नोट जर एटीएममधून निघाली तर, सर्वात आधी संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून माहिती द्या. ती नोट एटीएममधील सीसीटीव्हीकडे दाखवा म्हणजे नकली नोट त्याच एटीएममधून निघाली असल्याचे सिद्ध होईल. लगेचच याबाबत पोलिसांना माहिती द्या. त्यानंतर ज्या बँकेत तुमचे खाते असेल, त्याठिकाणीही कळवा.

Leave a Comment