नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले असून ग्राहकांना आता NEFT आणि RTGS सेवा वापरताना कोणताही चार्ज लागणार नाही. पण हा चार्ज फक्त बँकेत जाऊन ट्रान्झॅक्शन करणा-यांनाच लागेल. बँक याआधी २ ते ५ लाख रूपयांच्या RTGS ट्रान्झॅक्शनसाठी २५ रूपये चार्ज करत होते. तेच ५ लाखांवरील ट्रान्झॅक्शनसाठी ५० रूपये चार्ज लागत होता. पण ही सेवा आता मोफत झाली आहे. तुम्हाला १ नोव्हेंबरपासून कोणताही चार्ज लागणार नाही.
एचडीएफसी बँकेने हटवले ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे चार्ज
बँकेच्या NEFT सर्व्हिसच्या माध्यमातून १० हजार रूपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी २.५ रूपये चार्ज घेतला जात होता. तर १० हजार ते १ लाखांपर्यंत ५ रूपये चार्ज लागत होता. तसेच १ लाख ते २ लाखांच्या ट्रान्झॅक्शनसाठी १५ रूपये चार्ज लागत होता. आणि २ लाखांच्यावर रकमेसाठी २५ रूपये चार्ज घेतला जात होता.
बँकेने NEFT आणि RTGS चा वापर वाढण्यासाठी चेकची फि वाढवली आहे. ग्राहकांना आता वर्षाला २५ चेक असलेले एक चेकबुक मिळेल. दोन चेकबुक याआधी वर्षातून दिले जात होते. पण जर तुम्हाला आता जास्तीचे चेकबुक हवे असेल तर ७५ रूपये मोजावे लागतील.
आता आवश्यक बॅलन्स खात्यात नसल्याने चेक बाऊंस होतो. त्यासाठी आता अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. आता प्रत्येक बाऊंस चेकवर बँक ५०० रूपये फि आकारणार आहे. तेच जर चेक डिपॉझिट झाल्यावर परत गेला तर त्यावर १०० रूपयांऎवजी २०० रूपये चार्ज भरावा लागणार आहे.