नवी दिल्ली : एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपला आणखीन एक नवा प्लान लाँच केला असून ग्राहकांना एअरटेलच्या या ऑफरमध्ये ३०० जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लानमध्ये असणार आहे.
एअरटेलने आणला जबरदस्त प्लान
वर्षभरासाठी या प्लानची वैधता असणार आहे. ग्राहकांना प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. प्लानची खास बाब म्हणजे यामध्ये ग्राहकांना ३०० जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहक एका दिवसात हा डेटा वापरू शकतात किंवा वर्षभरही वापरु शकतात. इंटरनेट डेटाची ज्यांना अधिक आवश्यकता लागते अशा ग्राहकांना लक्षात ठेवून एअरटेलने हा प्लान लाँच केला आहे. पण ग्राहकांना या प्लानसाठी ३,९९९ रुपये द्यावे लागणार आहेत. पहिल्या महिन्यात २५ जीबी डेटा खर्च करावा लागेल
हा प्लान ३३४ एअरटेल युजर्ससाठी रुपयांमध्ये पडणार आहे. पहिल्या महिन्यात युजर्सला २५ जीबी डेटा खर्च करावा लागणार आहे. तर तो ग्राहक संपूर्ण वर्षभर डेटा वापरू शकतो. एअरटेलने यापूर्वी ३४९ रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. ज्यामध्ये २८ दिवसांची वैधता होती. दर १.५ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. त्यासोबतच १०० एसएमएस सोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.