…तर जिओवर विकतचे बोलावे लागेल


नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या ऑफर्स आणि प्लान्समुळे रिलायन्स जिओ चर्चेत आहे. पण जिओ युजर्ससाठी आता एक वाईट बातमी आहे. कारण, ग्राहकांकडून शुल्क वसुल करण्याचे प्लॅनिंग रिलायन्स जिओ करत आहे.

जिओने आपल्या टेरिफ प्लानच्या दरात गेल्या महिन्यात वाढ केल्यानंतर कंपनी आता फ्री वॉईस कॉलिंगच्या सुविधेवरही बंदी घालण्याची तयारी करत आहे. रिलायन्स जिओतर्फे आपल्या ग्राहकांच्या कॉलिंगचे मॉनिटरींग केले जात आहे. जर कंपनीला वाटत असेल की, तुमच्या जिओ नंबरवरुन एखादी कमर्शिअल अॅक्टिव्हिटी होत आहे किंवा फसवणुकीसाठी जिओचा नंबर वापरला जात आहे. तर, कंपनी तुमच्या नंबरवरील अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद करेल. आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबत प्रति दिन ३०० मिनिटे फ्री कॉलिंग रिलायन्स जिओ देणार आहे. म्हणजेच जिओच्या नंबरवरुन तुम्ही दिवसभरात ३ तासच फ्रीमध्ये कॉलिंग करु शकाल. या ३०० मिनिटांत तुम्ही कुठल्याही नेटवर्कवर कॉल करु शकता. ३०० मिनिटांपेक्षा अधिक जर तुम्ही कॉलिंग केले तर त्या क्रमांकाला कमर्शिअलच्या श्रेणीत टाकण्यात येईल. त्यानंतर या नंबरवरील जिओची फ्री कॉलिंग सुविधा बंद करण्यात येईल.

Leave a Comment