चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड मालवणमध्ये सापडला


सिंधुदुर्ग : चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये सापडला असून हा दगड शिवमुद्रा संग्रहालय मालवणचे संचालक उदय रोगे यांना सापडला. हा दगड लोकांना पाहण्यासाठी रोगे यांनी आपल्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे.

या दगडाचे वजन सुमारे २ किलो असून त्यांची लांबी १ फूट आहे. हा दगड समुद्रकिनारी फिरताना सापडल्याने दगडाला माती लागली होती. त्यामुळे तो धुण्यासाठी पाण्यात टाकला असता दगड पाण्यावर तरंगू लागला. श्रीलंकेत रामसेतू बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड याच प्रकारातील असल्याची माहिती याची माहिती शोधली असता मिळाली. दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही अशा प्रकारचे दगड आढळून येतात. अशा प्रकारच्या दगडांची निर्मिती ज्वालामुखीच्या लाव्हेचा पाण्याशी संयोग होऊन होत असल्याची माहितीही रोगे यांना मिळाली आहे.

Leave a Comment