मुंबई : शाओमीने सेल्फी चाहत्यांची आवड लक्षात घेऊन भारतात रेडमी Y1, आणि रेडमी Y1 लाईट हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले असून ३ जीबी + ३२ जीबी मेमरी असलेल्या रेडमी Y1च्या व्हेरिएंटची किंमत ८९९९ रुपये आणि ४ जीबी + ६४ जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये ऐवढी ठेवली आहे. तर रेडमी Y1 लाइटची किंमत फक्त ६९९९ रुपये ऐवढी आहे. ८ नोव्हेंबरपासून हे दोन्ही स्मार्टफोन mi.com आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय हा स्मार्टफोन ऑफलाइन रिटेल स्टोअरमधूनही खरेदी करता येईल.
शाओमीने आणले १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरावाले दोन शानदार फोन
५.५ इंच स्क्रीन शाओमी रेडमी Y1 स्मार्टफोनमध्ये देण्यात आली असून ७२०×१२८० पिक्सल याचे रेझ्युलेशन आहे. याशिवाय याला गोरील्ला ग्लास प्रोटेक्शनही असणार आहे. यामध्ये ऑक्टोकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ आणि ३ जीबी / ४ जीबी रॅम व्हेरिएंटही आहेत. या स्मार्टफोनमध्ये तब्बल १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे.
रेडमी Y1 लाइटमध्ये रेडमी Y1 प्रमाणेच फीचर्स असणार आहेत. पण स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी या स्मार्टफोनमध्ये असणार आहे.