सेल्फीप्रेमींसाठी दोन फ्रंट कॅमेर्‍यांचा आयटेल एस २१ सादर


आयटेल मोबाईलने सेल्फी लव्हर्ससाठी एस २१ हा दोन फ्रंट कॅमेरे असलेला स्मार्टफोन सादर केला असून ६ हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीतला देशातला हा पहिलाच या प्रकारचा स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. या स्मार्टफोनची किंमत आहे ५९९९ रूपये. मूनलाईट सिल्व्हर, शँपेन गोल्ड व एलिगंट ब्लॅक अशा तीन रंगात तो उपलब्ध करून दिला गेला आहे.

या स्मार्टफोनसाठी १२० डिग्री पॅनारोमिक फिल्ड व्हयू चे दोन फ्रंट कॅमेरे दिले गेले असून ग्रुप सेल्फीसाठी वाईड अॅपर्चर दिले गेले आहे. हे कॅमेरे २ व ५ एमपीचे आहेत. शिवाय ८ एमपीचा ऑटोफोकस, फेस डिटेक्शनसह कॅमेराही दिला गेला आहे. हा फोन फोर जी व्होल्टला सपोर्ट करतो. २७०० एमएएचची बॅटरी, ५ इंची आयपीएस डिस्प्ले, १ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फिंगरप्रिट सेन्सर, ड्युल अॅप अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment