व्होडाफोन देणार ४९ रुपयात दररोज १जीबी डेटा


मुंबई : व्होडाफोन ‘जिओ’ला मात देण्यासाठी भलतेच आक्रमक झाले आहे. व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत.

त्यातच बंगाल सर्कलच्या प्री-पेड ग्राहकांसाठी आता या कंपनीने नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत. कंपनी नेटवर्कशी जे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीने जोडले गेले आहेत किंवा जोडले जातील त्यांच्यासाठी हे व्हॉईस आणि डाटा प्लान असणार आहे. हे प्लान वेगवेगळ्या किंमतीचे आहेत. यातील सर्वात स्वस्त प्लान ४९ रुपयांचा असून यामध्ये २८ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी १ जीबी डाटा दिला जाईल.

तर ९६ रुपयांच्या दुसऱ्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी २ जीबी डेटा दिला जाईल. तिसऱ्या प्लानमध्ये ८४ दिवासांच्या व्हॅलिडीटीसोबत २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ जीबी डेटा मिळणार आहे. प्रत्येक दिवशी याची लिमिट १ जीबी असेल. सोबतच हे सर्व ग्राहक व्होडाफोन नंबरवर अनलिमिटेड कॉलही करू शकतील.

Leave a Comment