एअरटेलने सेलकॉनसोबत मिळून लाँच केला एक स्वस्त ४जी स्मार्टफोन


नवी दिल्ली : सेलकॉनसोबत मिळून दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने स्वस्त ४जी फोन लाँच केला आहे. १३४९ रुपये ऐवढी या फोनची किंमत आहे. एअरटेलच्या ‘माझा पहिला स्मार्टफोन’ (मेरा पहला स्मार्टफोन) या उपक्रमाचा हा स्मार्टफोन एक भाग आहे.

बाजारामध्ये ‘सेलकॉन स्मार्ट ४जी’ जो ३५०० रुपयात उपलब्ध आहे. ४ इंच आकाराची स्क्रीन, ड्युअल सिम स्लॉट, एफएम रेडिओ आणि अँड्रॉईड ओएस सिस्टम यामध्ये आहे. या फोनमध्ये गुगल प्लेच्या सर्व सुविधा मिळतील, ज्यामध्ये फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअप यांचा समावेश आहे. हा फोन माय एअरटेल अॅप, विंग म्युझिक आणि एअरटेल टीव्ही अॅपसोबत प्रीलोडेड येईल. एअरटेलने हा फोन १६९ रुपयांच्या मासिक शुल्कामध्ये लाँच केला आहे. या पॅकमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

तुम्हाला ही ऑफर मिळवण्यासाठी २८४९ रुपये डाऊनपेमेंट करावे लागेल. त्यानंतर सलग ३६ महिने १६९ रुपयांचे रिचार्ज करावा लागेल. ग्राहकांना १८ महिन्यांनंतर ५००, ३६ महिन्यांनंतर १००० आणि ३६ महिन्यांनंतर तुम्हाला १५०० रुपये कॅशबॅक मिळेल. अशा पद्धतीने ग्राहकांना हा फोन केवळ १३४९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

Leave a Comment