संशोधकांनी केला दावा; लवकरच येऊ शकते एड्स प्रतिबंधक लस


नवी दिल्ली – काही संशोधकांनी एचआयव्ही एड्स या रोगावर लवकरच लस तयार केली जाऊ शकते, असा दावा केला आहे. त्यांना एका रेणूचा शोध एका अभ्यासात लागला आहे. त्यांना ज्याच्या मदतीने अशी लस तयार करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले आहे. उंदरांवर याचा अभ्यास मेरीलँड आणि ड्युक विद्यापीठातील काही संशोधकांनी केला आहे. एचआयव्ही विषाणूंच्या भोवताली संरक्षणात्मक ढाल तयार झाल्याचे त्यांनी तयार केलेल्या प्रोटीन-शुगर लसीमध्ये त्यांना आढळून आले आहे. त्यांनी ही तयार केलेली लस उंदरांना टोचून अभ्यास केला. एचआयव्ही विषाणूंच्या विरोधात त्यावेळी त्यांना अँटीबॉडी तयार झालेले निदर्षणास आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment