सुंदर पिचाईंचे ‘बर्गर इमोजी’च्या चर्चेवर खास ट्विट


मुंबई : सध्या अनेकांना बर्गरच्या इमोजीमध्ये चीझचा स्लाईस पॅटीसच्या वर ठेवावा की खाली हा गहन प्रश्न पडला आहे. या प्रश्नाला घेऊन इंटरनेटवर खूप चर्चा होत आहे. या डिबेटमध्ये आता गूगलचे सीईओदेखील उतरले आहेत. गुगल आणि अ‍ॅपलच्या ‘बर्गर इमोजी’मधील फरक काही दिवसांपूर्वी बॅकडल मीडियाचे संस्थापक थॉमस बॅकडल यांनी दाखवला होता. यानंतर या मुद्द्यावरून ट्विटरवर खूप चर्चा रंगली होती.


बॅकडल यांनी दाखवलेल्या चित्रांप्रमाणे अ‍ॅपलने पॅटीसच्या वर चिझ ठेवले आहे. तर गूगलच्या इमोजीमध्ये पॅटीसच्या खालच्या बाजूला चीझचा स्लाईस आहे. पिचाईंनी या दोन्हींपैकी कोणता चूक कोणता बरोबर हे ठरवण्याआधी त्यावर पडदा टाकताना खास ट्विट केले आहे. सुंदर पिचाई म्हणतात, आता सारे विषय एका बाजूला ठेवूयात आणि सोमवारी कोण बरोबर ते ठरवूया’ पिचाईंच्या ट्विटला १४ हजार लोकांनी रिट्विट केले. यावर दीड हजारांहून अधिक लोकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

Leave a Comment