डोनट खाऊन ही कन्या मिळवितेय लाखो डॉलर्स


ऑस्ट्रेलियातील अवघी १९ वर्षांची डॅना विलियम्स केवळ डोनट खाऊन व परदेशी प्रवासाचे फोटो पेास्ट करून लाखोंची कमाई करत आहे हे सांगितले तर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर डॅना पोहोचली असून तिने आपल्या आवडीला मोठ्या हुशारीने कमाईचे साधन बनविले आहे. आता तिचे लाखो फॉलोअर आहेत व विविध कंपन्यांकडून तिने प्रमोशन करावे म्हणून भरभक्कम ऑफर तिला मिळत आहेत.

डॅनाला पहिल्यापासूनच भटकंतीची आवड आहे. आठ वर्षांची असल्यापासूनच ती भटकंती करते आहे. सुरवातीला ती आवड म्हणून फिरायची व त्याचे फोटो सोशल मिडीयावर लोड करायची. २०१५ मध्ये तिने वाँडरिंग डोनट नावाने पेज बनविले. व ट्रॅव्हल ब्लॉगवर ते शेअर केले. दोन वर्षात तिला लाखोंनी फॉलोअर्स मिळाले. आता विविध देशांकडून तिला पर्यटनासाठीची आमंत्रणे येतात व त्यातून ती चांगली कमाई करते आहे. तिच्या वेबसाईटला स्पॉन्सररही मिळाले आहेत.

आत्तापर्यंत ती देशोदेशीच्या डोनटचे फोटो शेअर करत असे आता मात्र तिला विविध कंपन्यांकडून त्यांच्या खाद्य उत्पादनांच्या कँपेनसाठी ऑफर येत आहेत. फिलिपिन्स, न्यूझीलंड यासाठी तिने नुकतेच ज्यूस र्कंपेन केले आहे.

Leave a Comment