पहिला 5 जी स्मार्टफोन क्वालकॉमचा?


फोर जी तंत्रज्ञान आता मागे पडण्याच्या वाटेवर असून फाईव्ह जी वर चालणारे स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या तयारीला लागल्या असतानाच प्रोसेसरी उत्पादक कंपनी क्वालकॉमने यात आघाडी मारली आहे. क्वालकॉमच्या पहिल्यावहिल्या फाईव्ह जी स्मार्टफोनचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत.

फाईव्ह जी नेटवर्क जगभरात २०२० पासून सर्वत्र उपलब्ध होईल असा अंदाज दिला जात असला तरी कांही तज्ञांच्या मते २०१९ मध्येच हे तंत्रज्ञान वापरात येणार आहे. ट्वीटर युजर शेरीफ हन्ना यांनी क्वालकॉमच्या फाईव्ह जी स्मार्टफोनचा फोटो त्यांच्या अकौंटवर पोस्ट केला आहे. या फोटोची दखल घेणे भाग आहे कारण हन्ना क्वालकॉम एलटीई व फाईव्ह जीएनआर मार्केंटिग विभागाच्या लीड पोझिशनवर आहेत.

Leave a Comment