यापुढे गुगल मुलाखती दरम्यान नाही विचारणार ‘हे’ प्रश्न


मुंबई : अनेकांचे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. गुगलमध्ये नोकरी मिळविणे एवढे सहज आणि सोपे नसते. गुगलमध्ये नोकरी मिळवण्याची प्रक्रिया खुपच किचकट कठीण असते. असे काही नोकरीच्या मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे देणे कठीणच नसते तर अनेकदा अशक्यही असते. पण हे प्रश्न आता अजून सोपे होणार आहे. मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या १२ प्रश्नांवर गुगलने बंदी घातली आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की हे कुठले १२ प्रश्न आहेत जे गुगल मुलाखती दरम्यान विचारणार नाही.

1. एक व्यक्ती आपली कार घेऊन हॉटेलमध्ये गेला आणि नशीब गमावून बसला? काय झाले त्याच्यासोबत?
२. घड्याळ्याचे काटे दिवसातून कधी एकत्र येतात?
३. अमेरिकेत दरवर्षी किती व्हॅक्युल क्लीनर बनतात?
४. सिएटलमध्ये सर्व खिडक्या धुण्यासाठी तुम्ही किती रुपये घ्याल?
५. मेनहोलचे झाकण गोल का असते?
६. संपूर्ण जगात किती पियानो ट्यूनर्स आहेत?
७. तुमच्या ८ वर्षाच्या भाच्याला तीन वाक्यात डेटाबेस समजावून सांगा
८. एका स्कूल बसमध्ये तुम्ही किती गोल्फ बॉल फिट करु शकता?
९. तुम्हाला ए पॉईंटवरुन बी पॉईंटवर जायचे आहे. मात्र तुम्हाला माहीत नाही कसे जायचे ते तर तुम्ही काय कराल?
१०. डेड बीफचे महत्त्व सांगा
११. एक व्यक्ती फोनवर सलग नंबर डायल करेल तर त्या नंबरने कोणता शब्द तयार होईल.
१२. सॅन फ्रॅन्सिस्कोमधून बाहेर पडण्यासाठी एक प्लान सांगा

दरम्यान याआधीही गुगलने काही प्रश्नांवर बंदी घातली होती. गुगलने अशाच प्रकारे १५ प्रश्नांवर २०११मध्ये बंदी घातली होती. मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नांचा काही संबध नसल्याने या प्रश्नांवर बंदी घालण्यात आली होती.

Leave a Comment