अमेरिकेच्या रस्त्यावर फिरतो आहे किम जोंग !


न्यूयॉर्क : अमेरिकेला वारंवार अणुयुद्धाची धमकी देणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन चक्क अमेरिकेत फेरफटका मारताना दिसला आणि तेथील लोक त्याला बघून अवाक् झाले. किम जोंगला पाहताच त्यांच्याकडे टकामका पाहायला लागले तर कुणी त्याच्यासोबत सेल्फीही काढला.

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर १० तास उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारखा दिसणारा एक व्यक्ती फिरत होता. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरुन तब्बल १० तास फेरफटका मारल्यानंतर हे डुप्लिकेट महाशय ट्रम्प टॉवरजवळ पोहोचले आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी आग्रह धरु लागला. ट्रम्प टॉवरमधील सुरक्षा रक्षकांनी अखेर रिसेप्शन भागातच या तोतया किम जोंग महाशयांना थांबवले आणि साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. एका प्रँक व्हिडिओसाठी हा सर्व खटाटोप करण्यात आला होता. हा व्हिडिओ आता जगभरातील सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.