जीपची भारतात लवकरच लॉन्च करणार सर्वात स्वस्त एसयूव्ही


नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्यासाठी जगातील प्रसिद्ध फोर व्हिलर निर्माता कंपनी जीपने नवी योजना तयार केली आहे. पूर्वीपासूनच भारतीयांची जीपच्या वाहनांना पसंती मिळाली असल्यामुळे आता येणाऱ्या नव्या गाड्याही नागरिकांना आवडतील अशी आशा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे. इंडियन ऑटो मार्केटमध्ये २०२० पर्यंत ५ नव्या एसयूव्ही सादर करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

सर्वातआधी यापैकी कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनिगेड ही एसयूव्ही लॉन्च केली जाणार आहे. रेनिगेड ही गाडी जीपची भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त एसयूव्ही असणार आहे. इतर कॉम्पॅक्ट सेडान क्रेटा आणि डस्टर याच्या आधारे जीप कंपनी रेनिगेडची किंमत ठरवणार आहे. क्रेटाच्या तुलनेत रेनिगेडची किंमत एक लाख रुपयांनी अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्या जगातील इतर देशांमध्ये रेनिगेडची जी साईज उपलब्ध आहे त्याची लांबी ४.२ मीटर, उंची १.७ मीटर आणि रुंदी १.९ मीटर आहे. याप्रमाणे रेनिगेड ही कॉम्पॅक्ट सेगमेंटच्या कारमध्ये सर्वात उंच आणि रुंद कार असणार आहे. भारतीय बाजारपेठे येणाऱ्या जीप रेनिगेडमध्ये कॅम्पसचे लोअर पॉवर आऊटपूट असलेलं इंजिन लावण्यात येणार आहे. या आधारे रेनिगेडमध्ये २.० लीटरचे डिझेल इंजिन असण्याची शक्यता असून १४० हॉर्सपॉवर हे इंजिन देते. या एसयूव्हीमध्ये १.६ लीटरचे मल्टीजेट इंजिनचा वापर करु शकते. कॅम्पसच्या आधारावरही जीप रेनिगेडमध्ये ४ व्हिल ड्राईव्हला ऑप्शनल देण्यात येणार असल्याची अपेक्षा आहे. २०१८च्या शेवटपर्यंत जीपची नवी एसयूव्ही भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते.

Leave a Comment