व्होडाफोनच्या सुपरवीक प्लॅन मिळणार ६९ रूपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा


मुंबई – प्रीपेड ग्राहकांसाठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने बजेट सुपरवीक टॅरिफ प्लॅन लॉन्च केला असून ७ दिवसांपूर्ती सुपरवीक प्लॅनची व्हॅलिडिटी असेल. डेटाऐवजी कॉलिंगला जास्त प्राधान्य या प्लॅनमध्ये देण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल मिळतील तर ५००एमबी डेटा देखील मिळणार आहे.

अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग आणि ४जी डेटा सुपरवीक प्लॅनमध्ये मिळेल. या टेरिफ प्लॅनचे रिचार्ज कंपनीच्या कोणत्याही स्टोअरमधून किंवा मायव्होडाफोन या अॅपमधून करता येणार आहे. रिलायन्स जिओनेही व्होडाफोन प्रमाणे एक आठवड्याची व्हॅलिडीटी असलेला प्लॅन आणला आहे. जिओच्या प्लॅनची किंमत ५२ रूपये असून यामध्ये १.०५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. दरदिवशी १५०एमबी डेटाची मर्यादा जिओच्या या प्लॅनमध्ये आहे.

Leave a Comment