व्हॉट्सअॅपवर अनावधानाने पाठवलेले मेसेज करता येणार रिकॉल


व्हॉट्सअॅपवरून आता चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना बहुप्रतिक्षित असे ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचरमुळे रिकॉल करता येणार आहे. याबाबत व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने दिलेल्या माहितीनुसार हे फीचर अँड्राईड, विंडोज आणि आयओएसवर उपलब्ध झाल्यामुळे युजर्स खूपच सुखावले आहेत.

व्हॉटसअॅपचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. त्यामुळे कदाचित आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. व्हॉटसअॅपवरून चुकून कधी आपण भलत्याच व्यक्तीला मेसेज किंवा फोटो पाठवतो. ती व्यक्ती कुणी तिऱ्हाईत असेल तर असा चुकीचा मेसेज गेल्यास वाईट अनुभव येण्याची शक्यता असते. व्हॉट्सअॅपजवळ याबद्दल अनेकांनी अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. व्हॉट्सअॅपने या फीचरची चाचणी सप्टेंबर महिन्यात केली होती आणि एवढ्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हे फीचर आता युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे.

Leave a Comment