
आज दुपारी १२.३० वाजता अॅपलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आयफोन एक्सचा सेल सुरू झाला आणि १२.३१ वाजता संपलाही. पण अवघ्या १ मिनिटात सर्व हँडसेट सोल्ड आऊट झाले. म्हणजेच अवघ्या काही सेकंदांमध्ये फोन आऊट ऑफ स्टॉक झाला. या फोनचे बुकींग ज्या ग्राहकांनी केले आहे, त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत याची डिलिव्हरी मिळणार आहे. दोन व्हेरीयंटमध्ये हा फोन लाँच झाला आहे. भारतात त्याच्या ६४जीबी व्हेरीएंटची किंमत ८९ हजार तर २५६जीबी व्हेरीएंटची किंमत १ लाख २ हजार रुपये आहे. फर्स्ट कम फर्स्ट तत्वावर आयफोन एक्स ग्राहकांना मिळणार आहे.
अवघ्या एका मिनिटात आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन एक्स
फ्लिपकार्ट आयफोन एक्स वर नो कॉस्ट इएमआयची ऑफर देत आहेत. महिन्याला ९८८९ रुपयांच्या हप्त्याने आयफोन एक्स याठिकाणी खरेदी करता येऊ शकतो. तर या फोनचा स्टँडर्ड इएमआय ३०८६ रुपये आहे. पण त्यावर व्याज द्यावे लागेल. त्यामाध्यमातून ३०८६ रुपयांचा पहिला हप्ता देऊन फोन खरेदी करता येईल. हा इएमआय ३६ महिने चालेल. अॅक्सिस बँक क्रेडीट कार्ड यूझ करून तुम्ही ५% अॅडिशनल डिस्काऊंट घेऊ शकता. आयफोन एक्स अमेझॉनच्या वेबसाईटवरूनही खरेदी करता येऊ शकतो.
