जिओच्या ३०९ रुपयांच्या प्लानची वापसी


मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आपला जुना प्लान परत आणला आहे. जिओकडून हा प्लान काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता. पण जिओने आता हा प्लान काही बदलांसह पुन्हा आणला आहे. कंपनी आता ३०९ रुपयांच्या या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड मेसेजिंगचीही सुविधा आहे. पण प्लानची वैधता ४९ दिवसांची आहे. याआधी याची वैधता ८४ दिवसांची होती. दिवसाचा तुमचा १ जीबी डेटा संपल्यास त्यानंतरही इंटरनेट सुरु राहील मात्र त्याचा स्पीड ६४ केबीपीएस एवढा असेल.

याशिवाय काही दिवसांपूर्वीच कंपनीने नवे प्लान जाहीर केले. या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ३५० जीबी हायस्पीड डेटा दिला जाणार आहे. या प्लानची वैधता ३६० दिवस असेल. तुमचा इंटरनेट डेटा जर ३६० दिवसांच्या आत संपला तर मोबाईलवर सर्फिंग बंद होणार नाही आणि यावर अनलिमिटेड इंटरनेट सुरु राहील. पण याचा स्पीड ६४ केबीपीएस एवढा राहील. याशिवाय या प्लानमद्ये अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड मेसेजिंगचीही सुविधा आहे. या प्लानमध्ये जिओचे सर्व अॅप तुम्ही ३६० दिवस वापरु शकता.

Leave a Comment