‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘आयफोन-एक्स’ची प्रि-ऑर्डर


मुंबई : आयफोन एक्सच्या प्रि-ऑर्डरची तारीख अॅपलकडून जाहीर करण्यात आली आहे. आयफोन एक्सची प्रि-ऑर्डर येत्या २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. आयफोन एक्स ३ नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. आयफोन एक्सची लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे.

आयफोन एक्सच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९ हजार, तर २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १ लाख २ हजार रुपये असेल, अशी माहिती मिळते आहे. यावेळी भारतासह अमेरिका आणि इंग्लंडमध्येही ३ नोव्हेंबर रोजी आयफोन एक्स लॉन्च केला जाणार आहे. पण २७ ऑक्टोबरपासूनच भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँग काँग, जपान, रशिया, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्येही प्रि-ऑर्डर सुरु केली जाणार आहे.

आयफोन एक्सला ५.८ इंच स्क्रीन असेल. या आयफोनच्या माध्यमातून अॅपल पहिल्यांदाच फेस आयडी टेक्नोलॉजी आणणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रि-ऑर्डर केल्यानंतर आयफोन एक्स हातात येण्यासाठी अर्थात आठवड्याभराची वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment