नव्या फिचर्सने परिपूर्ण आयआरसीटीसीचे नवे अॅप लवकरच येणार


नवी दिल्ली – लवकरच एक नवे अॅप भारतीय रेल्वे लाँच करत असून तुम्ही ज्याद्वारे पटकन तिकीट बुक करू शकणार आहात. आयआरसीटीसीने अँड्रॉइडवर आधारीत या अॅपची संपूर्ण योजना तयार केली आहे. अनेक नवे फिचरदेखील या अॅपमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टाईम आऊट यासारखी समस्या या अॅपमध्ये कधीही येणार नाही. यात लॉग इन करणे सोपे असेल. त्याचबरोबर या अॅपवर तुम्हाला कोणत्या तारखेचे कन्फर्म तिकीट मिळेल, हे देखील समजणार आहे. यात तात्काळ सेवेसाठी देखील खास फीचर असणार आहे. याचा दुरुपयोग होणार नाही, याची देखील काळजी घेण्यात आली आहे. रिअल टाईम आधारित रेल्वेच्या जाण्या आणि येण्याची माहिती प्रवाशांना पुरविण्यात येईल. एसएमएसच्या माध्यमातून देखील प्रवाशांना अलर्ट देण्यात येणार आहे.

रेल्वेला प्रवासादरम्यान उशीर होत असल्यास त्याची देखील पूर्वसूचना देखील प्रवाशांना देण्यात येणार आहे. ऐवढेच नाही तर रेल्वेला का उशीर होत आहे, याचे कारण देखील प्रवाशांना कळविण्यात येणार आहे. पुढील स्टेशन येण्यास किती वेळ लागणार आहे, याची देखील माहिती प्रवाशांना मिळेल. यासाठी रेल्वेने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ची मदत घेण्यात आली आहे. इस्त्रोच्या सॅटलाईटद्वारे सर्व आकडे एकत्र केले जाणार आहेत.

Leave a Comment