सौदी अरबमध्ये गुगल अर्थने शोधला दगडाचा प्राचीन दरवाजा


मेलबर्न – शास्त्रज्ञांनी गुगल अर्थ इमेजरीच्या मदतीने सौदी अरबमध्ये असे ४०० दगड शोधले आहेत ज्यांच्या उल्लेख यापूर्वी कुठेच करण्यात आला नव्हता. या दगडांना गेट्स नावाने ओळखले जाते. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे संशोधक डेव्हिड केनेडी याबाबत माहिती देताना सांगितले की सौदी अरेबिया हे प्रामुख्याने नापीक पर्वत आणि वाळवंट म्हणून ओळखले जाते, परंतु येथे मोठ्या प्रमाणावर पुरातन वास्तू आहेत. त्यांचा अजून शोध घेऊन त्यांची नकाशात नोंद करने अजून बाकी आहे.

केनेडी पुढे सांगतात की, हा नजारा तुम्हाला जमिनीवरून सहजरित्या दिसणार नाही पण जर तुम्ही १०० फुटांवरून किंवा उपग्रहाच्या माध्यमातून पाहिले तर ते खुपच सुंदर आहे. गुगल अर्थच्या सहाय्याने घेतलेल्या छायाचित्रात हे दगड खुपच सुंदर असल्याचे भासते. त्यांना आम्ही गेट्स नाव का दिले याबाबत सांगताना ते म्हणाले, कारण जेव्हा तुम्ही वरून बघता तेव्हा ते शेतात एक सामान्य दरवाजा असल्यासारखे वाटते. संशोधकांनी सांगितले की या संरचना अशा दिसतात की तिथे लोक राहत होते. त्यांनी सांगितले की या रचनेची निर्मिती कोणी केली असेल, पण असे मानले जाते की २००० ते ९००० वर्षांपूर्वी बांधले गेले असतील.

Leave a Comment