हीरो मोटोकॉर्पने एकाच दिवसात रचला अनोखा विक्रम


नवी दिल्ली : धनत्रयोदशीच्या दिवशी देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने एक विक्रम रचला आहे. तब्बल ३ लाखाहून अधिक मोटारसायकल्स आणि स्कूटर्सची या कंपनीने धनत्रयोदशीच्या दिवशी विक्री केली आहे. आतापर्यंतचा एखाद्या ऑटो कंपनीचा विक्रीमधील सर्वात मोठा रेकॉर्ड आहे.

या कंपनीने याआधी सप्टेंबर महिन्यात सात लाखाहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री केली होती. त्याचबरोबर वित्तीय वर्षातील दुसऱ्या तिमाहीत २० लाखाहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री करण्याचा विक्रमही हीरोच्या नावावर आहे. देशाच्या उत्तर, मध्य आणि पूर्व भागामध्ये हीरोच्या बाईक्स तसेच स्कूटर्सना मोठी मागणी असल्यामुळेच हीरोला हा विक्रम रचता आला.

Leave a Comment