एसबीआय खातेधारक दररोज एटीएममधून काढू शकतील २ लाख रुपये


मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेच्या खातेधारकांना आता दररोज एटीएममधून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. देशभरातील बँकाकडून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. आपल्या बँक खात्याच्या एटीएममधून सध्या खातेदार दिवसाला ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकत होता.

आपल्या ग्राहकांसाठी स्टेट बँकेने नवीन ऑफर आली आहे. यात स्टेट बँकेने एक डेबिट कार्ड लाँच केले आहे. तुम्ही या कार्डाच्या सहाय्याने दररोज एटीएममधून २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. त्याचबरोबर स्टेट बँकेचे खातेदार या डेबिट कार्डद्वारे दररोज ५ लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाईन व्यवहार करु शकतात.

स्टेट बँकेच्या क्लासिक डेबिट कम एटीएम कार्डद्वारे दररोज ४० हजार रुपये काढता येऊ शकतात. याच डेबिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंतचे ऑनलाईन व्यवहारही करु शकता.

तुम्ही दररोज एटीएममधून एसबीआय प्राईड मास्टर डेबिट कार्ड एटीएम कार्डने एक लाखांपर्यंतची रक्कम काढू शकता. देशात तसेच परदेशातही हे कार्ड वापरता येऊ शकते. तसेच या डेबिट कार्डद्वारे तुम्ही दोन लाखांपर्यंतचे ऑनलाईन व्यवहार करु शकता.

Leave a Comment