
बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता तीन बड्या खासगी बँकांसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना अल्पबचत योजनाअंतर्गत पैसे स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार पोस्टाप्रमाणेच आता या बँकांमधूनही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, रिकरिंग, मासिक उत्पन्न योजना, अशा अल्पबचत योजनातून ग्राहकांना पैसे गुंतविता येणार आहेत. यापूर्वी फक्त पोस्टातच या योजना उपलब्ध होत्या.
आता बँकांही घेऊ शकणार अल्पबचत गुंतवणूक
आता आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस या खासगी बँकांसह सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका या योजना ग्राहकांना देऊ शकणार आहेत. यापूर्वी लोक भविष्य निधी, किसान विकास पत्र २०१४, सुकन्या समृद्धी, वरीष्ठ नागरिक बचत योजना २००४ या योजना बँकातून ग्राहकांना उपलब्ध होत्या.
