देशातील पहिली तृतीयपंथी जज बनली जोडता मंडल


जोडता मंडल या कोलकात्यातील तृतीयपंथीयाने देशातील पहिली जज बनण्याची कामगिरी पार पाडली आहे. प.बंगालच्या इस्लामपूर लोक अदालतीत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ८ जुलै रोजीच त्यांची जज म्हणून नेमणूक झाली होती मात्र राज्य कायदा सेवा संस्थेकडून निर्णय मिळाला नसल्याने त्यासंदर्भातली घोषणा केली गेली नव्हती. आता जोडता यांचा जज बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोलकाता येथेच जन्मलेल्या जयंत मंडल याना तृतीयपंथी असल्याने शाळा सोडावी लागली त्यानंतर घरही सोडावे लागले होते. रस्त्यावर भीक मागून व फुटपाथवर राहून त्यांना दिवस काढावे लागले. नोकरीसाठी कॉल सेंटर जॉईन केल्यावर तेथेही अन्य सहकार्‍यांकडून सतत उपेक्षा व अवहेलना झेलावी लागली. लोक अदालतीत तीन जजचे खंडपीठ असून त्यात १ वरीष्ठ न्यायाधीश, १ वकील व १ सोशल वर्कर यांचा समावेश असतो. त्यातील सोशल वर्करच्या जागेवर जोडता यांची नेमणूक केली गेली आहे. ते नवा रोशनी फॉर दिनाजपूर डिस्ट्रीक्ट संस्थेत सोशल वर्करम्हणून बराच काळ काम करत आहेत.

Leave a Comment