ट्रायम्फने भारतात लॉन्च केली नवीन दमदार बाईक


नवी दिल्ली : आपली प्रीमियम बाईक स्ट्रीट ट्रिपलचे नवे मॉडल ट्रायम्फ या कंपनीने लॉन्च केले आहे. स्ट्रीट ट्रिपल ७६५ आरएस असे या बाईकचे नाव आहे. या बाईकची भारतात किंमत १०.५५ लाख रूपये ऐवढी ठेवण्यात आली आहे.

मार्केटमध्ये आधीपासूनच या बाईकचे तीन व्हेरिएंट ट्रायम्फ इंटरनॅशनल विकत आहे. भारतातील हे या नवीन जनरेशन बाईकचे दुसरे व्हेरिएंट असून भारतात याआधी स्ट्रीट ट्रिपल एस मॉडल लॉन्च करण्यात आले आहे. जुन्या स्ट्रीट ट्रिपल एस मॉडलसारखेच या बाईकचे डिझाईन आहे. पण यत नवीन आणि स्पोर्टी एन्ड मिरर, रिअर सीट काऊल देण्यात आले आहे. ही बाईक सिल्वर आणि ब्लॅक पेंटमध्ये उपलब्ध असेल.

नवीन बाईकमध्ये जुन्या मॉडलप्रमाणेच इंजिन देण्यात आले आहे. पण ही नवीन बाईक शक्तीच्या बाबतीत अधिक दमदार आहे. ही बाईक ११,७०० आरपीए १२३ बीएसपीची पावर जनरेट करते. सोबतच १८८०० आरपीएमवर ७७ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या नव्या मॉडलमध्ये ब्रेम्बो ब्रेक्स आणि मागे मोनोशॉक अब्जॉर्बर देण्यात आले आहे.

६ स्पीड ट्रान्समिशन या बाईकच्या इंजिनला देण्यात आले आहे. यासोबतच यात ५ ड्रायव्हिंग मोड्स, रेन, स्पोर्ट, रेस, रायडर आणि ट्रॅक देण्यात आले आहे. तसेच चार लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, रोड, रेन, ट्रॅक आणि ऑफ रोडिंगचेही फिचर्स देण्यात आले आहे. १६६६ किलो वजन असलेली ही बाईक जुन्या मॉडेलच्या तुलनेत २ किलोने कमी करण्यात आली आहे.

Leave a Comment