स्वस्तात सोने विकत घ्यायचे आहे का…


नवी दिल्ली – आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनतेरस आहे. या मुहूर्तावर आपण सोने विकत घेऊ शकतो एवढे देखील सोने स्वस्त झालेले नाही. बातमी लिहीत असताना आता मुंबई बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव २९,३४० रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ३१,३७८ रुपये प्रति तोळा आहे. यात जर तुम्हाला अशी माहिती मिळाली की काही संस्था आणि बँका स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे तर किती आनंद होईल ना तुम्हाला….

जर का तुम्ही सोन्याच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छित असाल तर अॅमेझॉन आपल्या अपेक्षित भावात सोन्याची नाणी १० टक्के सवलतीच्या भावात देत आहे. तुम्ही ही नाणी Joyalukkas, मलाबार, सेन्को गोल्ड, ब्ल्यूस्टोन, पीएनजी, कामा ज्वेलर्स आणि एमएमटीसी-पीएएमपीमधून विकत घेऊ शकता. ही नाणी १ ग्रॅमपासून ते ५० ग्रॅमपर्यंत २२ कॅरेट आणि २३ कॅरेटमध्ये उपलब्ध आहेत.

या दिवाळीला पेटीएमने देखील आपली ‘दिवाळी गोल्ड सेल’ ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना धनतेरसच्या दिवशी गोल्डफेस्ट प्रोमोकोड वापरून कमीत कमी १० हजाराच्या खरेदीवर ३ टक्के अतिरिक्त पेटीएम गोल्ड मिळवू शकता. ग्राहक पेटीएम गोल्डची भारतातील एकमेव आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त रिफाइनरी एमएमटीसी-पीएएमपीमधून १ रुपया एवढ्या कमी किमतीत २४कॅरेटचे ९९९.९ शुद्ध सोने विकत घेऊ शकतात. ग्राहक आपले सोने चालू भावात एमएमटीसी-पीएएमपीमध्ये विकू देखील शकतात.

आजच्या घडीला सर्वच ज्वेलर्स स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत आहेत. जर का तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे तर तुम्ही मिया आणि तनिष्क ज्वेलरीमधून ५ टक्के सवलतीच्या दरात सोने विकत घेऊ शकता. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्ही खबरने दिले आहे.

Leave a Comment