होंडाने आणली गोल्ड विंग टूरिंग बाईक


मुंबई :सध्याच्या घडीला तंत्रज्ञानात झपाट्याने विकास होत आहे. आता चारचाकींप्रमाणे दुचाकी गाड्यांमध्येही ‘लग्झरी बाईक्स’चा ट्रेंड वाढत असून जगभराप्रमाणेच आजकाल भारतातही महागड्या आणि लग्झरी बाईक्सची मागणी वेगाने वाढते आहे. परिणामी दिवसेंदिवस या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत आहे.

होंडानेही लग्झरी बाईकमधील वाढती स्पर्धा पाहून यामध्ये आता उडी घेतली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी होंडाने डिझाईन केलेली गोल्ड विंग नावाची बाईक २४ ऑक्टोबरला सादर केली जाणार आहे. दोन व्हेरिएंटमध्ये गोल्ड विंग ही बाईक येत आहे. गोल्ड विंग बाईकमध्ये की- लेस इग्निशन, हीटेड ग्रीप्स सीट, ऑडिओ फोन कनेक्टीव्हीटी, क्रूज कंट्रोल, सॅटेलाईट नेव्हीगेशन, सेमी अॅक्टीव्ह सस्पेंशन हँडल अशी फिचर्स देण्यात येणार आहेत.

ही बाईक बाईकचा पुढचा भाग हलका असल्याचे हँडलींगला अत्यंत सुकर आहे. फ्लॅट सिक्स युनिट इंजिन यामध्ये असून हे इंजिन अपग्रेड करण्याचीही सोय आहे. ही बाईक भारतात कधी येणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच या बाईकची किंमतही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Comment