एअरटेल देत आहे ७७७७ रुपयात आयफोन ७!


नवी दिल्ली – भारती एअरटेलकडून नुकतीच केवळ ७७७७ रुपयांच्या डाऊन पेमेन्टवर आयफोन ७ देण्याची घोषणा करण्यात आली. ग्राहकांना प्रत्यक्षात फोनचा मालक होण्यासाठी प्रतिमहिना २४९९ रुपयांचे २४ हप्ते द्यावे लागतील. आपली नवीन डिजिटल सेवा ‘द ऑनलाईन स्टोअर’ या नावाने एअरटेलने सुरू केली. ग्राहकांना या संकेतस्थळावर प्रीमियम स्मार्टफोन आकर्षक डाऊन पेमेन्ट, सुलभ मासिक हप्ते आणि किफायतशीर व्याजदरात मिळतील. ऍपलचा आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस एअरटेलच्या ऑनलाईन स्टोअरवर दाखल करण्यात आला.

पोस्टपेड प्लॅनमध्ये आयफोन ७ चे मासिक हप्ते देण्यासाठी सादर करण्यात येतील. ग्राहकांना यामध्ये ३० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, एअरटेल सिक्युरिटी पॅकेज यांचा समावेश आहे. फोनचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास भरपाई आणि सायबर सुरक्षा या पॅकेजमध्ये देण्यात येईल. या स्टोअरसाठी एअरटेलने ऍपल इंक, एचडीएफसी बँक, क्लाईस कॅपिटल, सेयान्स टेक्नोलॉजी, ब्राईटस्टार टेलीकम्युनिकेशन आणि वॉल्कन एक्स्पेस यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. ही सेवा सध्या २१ शहरांत उपलब्ध असून लवकरच तिचा विस्तार करण्यात येईल.

Leave a Comment