चीन भारतात उपलब्ध करणार सात लाख नोकऱ्या


नवी दिल्ली – सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. मोदी सरकारसाठी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. दरम्यान भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनकडून या बाबत सरकारला दिलासा देणारे वृत्त येत आहे.

भारतात सुमारे ८५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना चीनच्या सॅनी हेवी इंडस्ट्रीसह जवळपास ६०० कंपन्या बनवत आहेत. भारतातील ज्या प्रकल्पांमध्ये या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत, त्यामुळे देशात येत्या पाच वर्षात सात लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ही योजना जर सफल झाली तर मोदींसाठी २०१९ ची लढाई सोपी राहणार आहे.

देशात गुंतवणुकीस अनुकूल वातावरण तयार करण्याची योजना परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारच्या नीति इन्वेस्ट इंडियानुसार बनवली जात आहे. इन्वेस्ट इंडियाचे एमडी दीपक बागला यांनी सांगितले की, आम्ही २०० अशी कंपन्यांची यादी बनवली आहे, ज्या भारतात गुंतवणूक करत नाहीत. त्यांनी सांगितले, की येत्या दोन वर्षात १०० अब्ज डॉलर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

भारतात आर्थिक वर्ष २०१७ मध्ये सर्वाधिक ४३ अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक झाली आहे. जगातील मोठी इंजिनियरिंग मशीनरी मॅन्युफैक्चरर्समध्ये सामील चीनची सॅनी हेवी इंडस्ट्री भारतात ९.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रात या कंपन्यांनी अधिक रस दाखवला आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन आाणि ई-कॉमर्सचा नंबर लागतो. भारतात गुंतवणुकीचे सर्वाधिक (४२ टक्के ) प्रस्ताव चीनकडून आले आहेत. त्यानंतर अमेरिका २४ टक्के व ११ टक्के इंग्लंडचे आहेत. रोल्स रॉयसची ३.७ अब्ज डॉलर आणि ऑस्ट्रेलियाच्या पेर्डामॅन इंडस्ट्रीजची तीन अब्ज डॉलर गुंतवणुकीचे धोरण आहे.

Leave a Comment