खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध लग्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने आपली नवी हायब्रिड सायकल लाँच केली आहे. ही एक इलेक्ट्रिक सायकल असून, २ लाख ६० हजार रुपये ऐवढी याची किंमत असणार आहे.
बीएमडब्ल्यूची लाखमोलाची सायकल
सायकलमध्ये कंपनीकडून ५०४ वॅटची हाय-परफॉर्मस् बॅटरी देण्यात आली आहे. या सायकलच्या बॅटरीला एकदा फुल चार्ज केल्यास ही सायकल १०० किलोमीटरपर्यंत धावू शकेल. या सायकलमध्ये बीएमडब्ल्यूकडून एक दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून, ज्यामध्ये ९० एनएम पीकचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे. तसेच या बॅटरीच्या माध्यमातून २५० वॅटची पॉवर निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. या ई-बाईकमध्ये कंपनीने अॅल्युमिनियम फ्रेम, मडगाडमध्ये एलईडी लाइट, आरामदायी आसनक्षमता, अॅडव्हान्स बॅलेन्स असे अत्याधुनिक फिचर्स अॅड करण्यात आले आहेत.