३९९ रुपयात व्होडाफोन देणार ९० जीबी डेटा


मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने आता नवा प्लॅन लाँच केला आहे. ६ महिन्यांपर्यंत हा प्लॅन वैध असणार आहे. तसेच यूजर्सला यात जास्तीत जास्त डेटा मिळणार आहे. व्होडाफोनने आपल्या यूजर्ससाठी ३९९ रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. यूजर्सला या प्लॅनमध्ये तब्बल ९० जीबी ४ जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

रिलायन्स जिओ आणि एअरटेलला व्होडाफोनच्या या नव्या प्लॅनमुळे आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे. यूजर्सला या प्लॅनमुळे अधिक दिवस डेटा वापरता येणार आहे. व्होडाफोनचा याआधी देखील ३९९ रुपयांचा प्लॅन सुद्धा होता. पण , यामध्ये आता थोडेफार बदल करुन नवा प्लॅन बाजारात आणला आहे. फक्त नव्या ग्राहकांना हा प्लॅन दिला जातो, असेही काही नियम आहेत, तेव्हा तुम्ही व्होडाफोन गॅलरीत जाऊन याची अधिक माहिती घेऊ शकतात.

Leave a Comment