नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी रचला झटपट ‘टाय’ बांधण्याचा विक्रम


नागपूर – केवळ १२.८९ सेकंदात ‘विंडसर नॉट’ (दोन गाठी असलेली टाय) ‘टाय’ नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी बांधला. सध्या कमी वेळेत ‘टाय’ बांधण्याचा विक्रम १२.९१ सेकंदाचा आहे. शर्मा यांनी ही प्रक्रिया त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्याने ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या नावाची नोंद होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वेगाने ‘विंडसर नॉट’ बांधण्याचा विश्वविक्रम मोडण्यासाठी छंद वैभवच्या वतीने दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या व्यासपीठावर रविवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. दीपक शर्मा यांनी यामध्ये पहिल्याच प्रयत्नात १२.८९ सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण करून नवा विक्रम केला आहे, पण गिनिज बुकमध्ये याची नोंद होण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच त्या विक्रमाची नोंद होईल किंवा नाही, ते कळू शकणार आहे. न्यूझीलंडचे अ‍ॅलास्टेअर गॅल्पिन यांच्या नावावर १२.९१ सेकंदात ‘विंडसर नॉट’ बांधण्याच्या विक्रमाची नोंद आहे. २७ ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी तो केला होता.

Leave a Comment