दिवाळीनंतर पुन्हा सुरू होत आहे जिओफोनची बुकींग


नवी दिल्ली – आपल्या ४ जी फीचर फोन जिओफोनची बुकिंगचा दुसरा टप्पा रिलायन्स रिटेल दिवाळीनंतर सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीने जवळपास ६० लाख बुकींग केलेल्या ग्राहकांना फोनचा पुरवठा करत आहे.

याबाबत रिलायन्स रिटेल कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर जिओफोन बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू होईल. ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बुकींग सुरू होऊ शकते. २४ ऑगस्टला जिओफोनची बुकींग सुरू झाली होती. त्यावेळी पहिल्या तीन दिवसातच जवळपास ६० लाख लोकांनी ५०० रुपये भरून फोन प्रीबुकिंग केला होता. जिओफोनची किंमत शुन्य असली तरी ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी १५०० रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवायची आहे. ही रक्कम तीन वर्षानंतर कंपनीकडून परत केली जाणार आहे.

Leave a Comment