ब्रिटनमध्ये नाणेबंदीनंतर जुन्या पौंडाला प्रचंड किंमत


भारतातील नोटबंदी प्रमाणेच बनावट नाण्यांना आळा घालण्यासाठी ब्रिटनने रविवारी जुन्या पौंडाचे नाणे बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे मात्र त्यामुळे जुन्या पौंडाना भविष्यात चांगले मोल येणार हे जाणून अँटीक वस्तूंचा व्यापार करणार्‍यांनी असे जुने पौंड १ पौंडाला ३५ पौंडापर्यंत रक्कम देऊन खरेदी करण्याचा सपाटा लावला असल्याचे समजते. वास्तविक जुना पौंड नाणे रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने पुरेशी आधीपासून केली होती तरीही व्यापारी वर्गाकडून सरकारने कमी वेळ दिला असल्याची ओरड केली जात आहे.

नाणेबंदी केल्यानंतर बाजारातून १.२० अब्ज मूल्याची नाणी सरकारने काढून घेतली आहेत तरीही अजूनी ५० कोटी नाणी सरकारकडे परत आलेली नाहीत.ब्रिटनमध्ये दर ३० पौंड नाण्यामागे १ नाणे बनावट असल्याचे समजते. ही बनावट नाणी चलनात असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. जुन्या गोल आकाराच्या पौंडाच्या नाण्याची जागा नव्या १२ कोनी नाण्याने घेतली असून त्याचा आकार तेवढाच आहे. नव्या नाण्याला चांदीची चमक असून काठावर सोनेरी आहे. या नाण्याची नक्कल करता येणार नाही असा सरकारचा दावा आहे.

Leave a Comment