होंडाची गोल्ड विंग टूरिंग बाईक २४ आक्टोबरला सादर होणार


भारतात तसेच जगभरात सर्वत्रच आजकाल महागड्या तसेच लग्झरी बाईक्सची मागणी वेगाने वाढते आहे. परिणामी या क्षेत्रातील स्पर्धाही तीव्र झाली आहे.याच स्पर्धेत होंडानेही उडी घेतली असून त्यांची खास दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी डिझाईन केलेली गोल्ड विंग नावाची बाईक २४ आक्टोबरला सादर केली जात आहे. दोन व्हेरिएंयमध्ये ही बाईक येत आहे.

या बाईकसाठी की- लेस इग्निशन, हीटेड ग्रीप्स सीट, ऑडिओ फोन कनेक्टीव्हीटी, क्रूज कंट्रोल, सॅटेलाईट नेव्हीगेशन, सेमी अॅक्टीव्ह सस्पेंशन हँडल अशी फिचर्स दिली गेली आहेत. बाईकचा पुढचा भाग हलका असल्याचे हँडलींगला ही बाईक फारच छान आहे. फ्लॅट सिक्स युनिट इंजिन असून हे इंजिन अपग्रेड करता येणार आहे. भारतात ही बाईक कधी येणार हे अजून स्पष्ट केले गेलेले नाही तसेच बाईकची किमतही जाहीर केली गेलेली नाही.

Leave a Comment