फटाके बंदीचा सर्वाधिक फटका शिवकाशीला


पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी यंदाच्या वर्षी फटाके विक्री बंदी घातल्याचा सर्वाधिक फटका तमीळनाडूतील देशातले सर्वात मोठे फटाका उत्पादन केंद्र असलेल्या शिवकाशी या गावाला बसला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी येथील स्थानिकांसाठी निराशेची ठरते आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी या शहराला भारताचे मिनी जपान असे नांव दिले होते . जपानने आकाशात फुटणारा जगातील सर्वात मोठा फटका तयार केला होता त्यारून नेहरू यांनी या गावाला मिनी जपान म्हटले होते.


शिवकाशीमध्ये आज वर्षातले ३०० दिवस फटाके बनविण्याचेच काम केले जाते. देशातील फटाक्याच्या उत्पादनापैकी ९० टकके फटाके येथे बनतात व स्थानिक फटाके कारखान्यांतूनच काम करतात व या गावात ४०० लहान मोठे फटाके कारखाने आहेत. गल्ली गल्लीतून येथे हे कारखाने आहेत व गावाची अर्थव्यवस्था याच उद्योगावर अवलंबून आहे. फटाके कारखान्यातून काम करणार्‍या नोंदणीकृत कामगारांची संख्या आहे ७ लाख. त्यात महिला पुरूष मुले सर्वांचा समावेश आहे. दरवर्षी येथे फटाक्यातून १०० कोटींचा व्यवसाय केला जातो. अनेकदा येथे कारखान्यातून स्फोट होऊन कामगार मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या गावात १९२२ साली प्रथम अय्यर नायर व त्यांचे बंधू शनमुगा यांनी फटाका कारखाना सुरू केला होता.

या गावात केवळ शोभेचेच नाही तर लष्कराच्या प्रशिक्षणासाठी लागणारी शस्त्रेही बनविली जातात असे समजते.

Leave a Comment