सॅमसंगचा स्वस्त गॅलक्सी जे२ (२०१७) लाँच


मुंबई : गॅलक्सी जे२ (२०१७) हा बजेट स्मार्टफोन कोरियन मोबाईल उत्पादक सॅमसंगने भारतात लाँच केला आहे. फक्त ७३५० रुपयात ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने जे सीरीजच्या या स्मार्टफोनसाठी कोणताही गाजावाजा केला नव्हता.

हा फोन सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर अचानक लिस्ट करण्यात आला. पण कधीपासून हा फोन उपलब्ध असेल याबाबत कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. गॅलक्सी जे२ (२०१७) मध्ये ४ जी सपोर्ट असणार आहे. तसेच त्यासोबत अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोडही असणार आहे. या फीचरमुळे बराच डेटाची बचत होते.

Leave a Comment